Pune Crime News | पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच रस्त्याने जाणाऱ्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. स्वारगेट परिसरात एका तरुणाला सारसबाग कुठे आहे, कसे जायचे असे विचारुन लुटण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) एका सराईत गुन्हेगारासह (Criminal On Police Records) दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी तीन वाजता नेहरू स्टेडियम (Nehru Stadium Pune) ते अण्णाभाऊ साठे पुतळा चौकादरम्यान (Anna Bhau Sathe Putla Chowk) घडली आहे.(Pune Crime News)

याबाबत ओम चंद्रकांत भोसले (वय-19 रा. विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी उदय सुनिल जाधव Uday Sunil Jadhav (वय-21 रा. सोमवार पेठ, पुणे), विशाल हुसेनअप्पा शिरे (वय-23 रा. गंज पेठ, महात्मा फुले वाडा, पुणे) याच्यावर आयपीसी 394, 397, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी उदय जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओम भोसले हे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कामावरुन घरी जात होते. त्यावेळी नेहरू स्टेडियम येथे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने (एमएच 12आरएच 3023) दुचाकी ओम याच्याजवळ थांबवली. आरोपींनी सारसबाग कुठे आहे, तिकडे कसे जायचं असे विचारुन ओमचे लक्ष विचलीत केले. दुचाकीवर मागे बसलेल्या उदय जाधव याने ओमच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मोबाईल घट्ट पकडल्याने आरोपीला मोबाईल चोरता आला नाही.

त्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पुढे निघून जाऊन अण्णाभाऊ साठे चौकात रस्त्याच्या कडेला थांबले.
ओम याच्याकडे येऊन विशाल शिरे याने तु माझ्या बहिणीची छेड का काढली असे खोटे बोलून ओमसोबत वाद घातला.
तर आरोपी उदय याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
तसेच त्याच्या खिशातील पैशाचे पाकिट जबरदस्तीने काढून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
याबाबत ओम भोसले याने तक्रार देताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस

Lohegaon Pune Crime | पुणे : मैत्रिणीसोबत ठेवले संबंध, अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल

Baramati Lok Sabha | बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का? अजित पवार म्हणाले, 7 मे पर्यंत भावनिक…