Baramati Lok Sabha | बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का? अजित पवार म्हणाले, 7 मे पर्यंत भावनिक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | एकदा ७ तारखेला बारामतीचे मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील जुने नाते पुन्हा पूर्ववत होणार का? या प्रश्नावर ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Baramati Lok Sabha)

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही पुढे एकत्र येणार, याबाबत जो प्रचार बारामतीमध्ये केला जात आहे, त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा.

बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, निवडणुकीत भावनिक नाते चालत नाही.
७ मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचे नाही असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार
आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीने करता येईल.

ते पुढे म्हणाले, बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत.
ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस