Pune Crime News | गायक सिद्धू मुसेवाला कांडमधील शार्प शूटर संतोष जाधवच्या नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणीची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | देश-परदेशात गाजलेल्या गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील (Singer Sidhu Moosewala Murder Case) शार्प शूटर संतोष जाधव (Sharp Shooter Santosh Jadhav) याच्या नावाने पुण्यातील एका व्यावसायिकाला फोन करुन त्यांच्याकडे खंडणी (Extortion) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तुझ्या जीवाची १५ लाखांची सुपारी मिळाल्याचे सांगून धमकाविण्यात आले आहे. (Pune Crime News)

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची कॅनडातील गॅगस्टरने २९ मे २०२२ रोजी हत्या केली होती. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील शार्प शूटर संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला सुपारी देण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यावर ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. त्याच्यासह साथीदारांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोका कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. (Pune Crime News)

याबाबत कोथरुड येथील एका ३४ वर्षाच्या व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. ते गेले काही दिवस आजारी आहेत. कोथरुडमधील घरी ते असताना त्यांना शनिवारी सायंकाळी एक फोन आला. फोन करणार्‍याने सिद्धु मुसेवाला कांड ऐकला आहे का, मी संतोष जाधव बोलत आहे.
तुझ्या नावाची १५ लाखांची सुपारी मिळाली आहे. तुझा जीव हवा असेल तर तू किती देतोस बोल.
पैसे नाही दिले तर गोळ्या घालीऩ, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे असे म्हणून पुन्हा धमकावले.
या फोननंतर या व्यावसायिकांनी घाबरुन तातडीने कोथरुड पोलीस ठाणे गाठले. कोथरुड पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, तीन महिलांची सुटका