Pune Crime News | कर्णबधिर मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Crime News | शिवाजी नगर, पुणे येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दि. ०५.०९.२०२३ रोजी बंडगार्डन पोलिसांना (Bundgarden Police Station) पुणे जिल्हा परिषद (Pune ZP) येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. शिवाजी विधाते (Dr. Shivaji Vidhate) यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. पुणे जिल्हा परिषद येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्या विरुद्ध कर्णबधिर मुलीची फसवणूक आणि विनयभंग केल्या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ३५४, ४२०, ५०४, ५०६ आणि ५०९ यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. (Pune Crime News)

ही घटना पीडित मुलगी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना घडली डॉ. विधाते हे सतत पीडितेला त्यांच्या कार्यालयात कामासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलवत असे, ते सतत पीडितेकडे एका वेगळ्या नजरेने पाहत असे, परंतु ते अधिकारी असल्यामुळे पीडितेला त्यांना बोलण्याची हिंमत होत नव्हती, असेच एके दिवशी त्यांनी पीडितेला अचानक त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि पीडितेला “तुझा हात दाखव” असे म्हणाले पीडितिने लांबूनच डॉ. विधाते यांना हात दाखवला असता, त्यांनी बळजबरीने तिच्या इच्छे विरोधात हात ओढून स्वतःकडे ओढले आणि हात खूप जोरात दाबून तिच्या मोबाईलची मागणी केली, असा गैरवर्तनाचा त्रास वारंवार पीडितेला सदरील आरोपीकडून होत होता, पीडित मुलगी ही त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर कामाला होती, “तुला कायमस्वरूपी वेतनश्रेणीवर कामावर घेतो” म्हणून सतत पैशाची मागणी करत असे, कंत्राटी पद्धतीत कामावर येणारा पगार पैकी 50% रक्कम द्यावी लागेल अशी मागणी केली, तसेच वारंवार शरीर सुखाची मागणी करत असे. (Pune Crime News)

सदरील घटनेची पीडित मुलीने बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे तात्काळ तक्रार केली. परंतु बंडगार्डन पोलिसांनी सदरील प्रकरण विशाखा समिती, जिल्हा परिषद, येथे वर्ग करून त्यांच्याकडून रिपोर्ट मागवला. त्या रिपोर्ट मध्ये विशाखा समिती, जिल्हा परिषद ,पुणे यांनी असे नमूद केले की, आरोपी डॉ. शिवाजी विधाते यांचा हात पीडितेचा मोबाईल घेत असताना तिच्या हाताला लागला असा रिपोर्ट दिला, तरी देखील बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.

सदरील घटनेबाबत पीडिते ने प्रथम वर्ग न्यायालय शिवाजीनगर (Pune Shivaji Nagar Court)
येथे न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली असता, मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती चंद्रशेला पाटील यांनी
सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि बारकाईने विचार करून डॉ, शिवाजी विधाते यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दि.०५.०९.२०२३ रोजी बंडगार्डन पोलिसांना दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल