Pune Crime News | मौजमजेकरीता वाहनचोरी करणारा गजाआड, 14 दुचाकी जप्त; गुन्हे शाखा आणि हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथक दोन व हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. मुजफ्फर उर्फ सलमान रफिक पठाण (वय-26 रा. घुलेनगर, मांजरी खुर्द हडपसर/संत तुकाराम नगर भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी आरोपी सलमान पठाण याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने पुणे शहरात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. (Pune Crime News)

आरोपी सलमान पठाण याला हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गन्ह्यात वर्ग करुन तपास पथकाने सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने बुधवारी (दि.20) आणखी सहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हडपसर पोलिसांनी 2 लाख 80 हजार रुपयांच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये होंडा युनिकॉर्न, बजाज पल्सर, स्प्लेंडर, ग्लॅमर, होंडा शाईन, ड्रीम युगा अशा दुचाकी आहेत. आरोपीने या दुचाकी हडपसर, लोणी काळभोर, वाकड, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत.

अशी करत होता चोरी

आरोपी वाहन चोरी करताना बसने निघत होता. वाहन चोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून निघून जात होता. दुचाकी चोरी करुन घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण दिसू शकतो ही शक्यता गृहीत धरुन तो अंगात 8 ते 10 वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत होता. जेणेकरुन त्याचा सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेताना पोलिसांना अडथळे निर्माण होतील.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रम देशमुख
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सुचनेनुसार, तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर,
शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड,
सचिन गोरखे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smriti Irani To Sonia Gandhi | महिला आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली, स्मृती इराणींचे सोनिया गांधीना प्रत्युत्तर