Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार; गुंतवणुक केलेले ४ कोटी परत मागितल्याने केला अत्याचार

पुणे : Pune Crime News | व्यवसायासाठी गुंतविलेले ४ कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्या असताना बंदुकीचा धाक दाखवून त्याने बलात्कार (Rape Case) केला. त्याचे व्हिडिओ शुटींग (Video Shooting) करुन वारंवार शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफिक शेख Juganu alias Shafiq Sheikh (वय ४५), मुस्ताक मोमीन (वय ४६), केतन व महाराज अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व जुगनू शेख याच्यांमध्ये भिशी होती. ही २०२० मध्ये बंद झाली.
त्यानंतर शेख याने फिर्यादी यांना दुसरा व्यवसाय करु असे सांगून फिर्यादी व फिर्यादी यांची मैत्रिण यांचेकडून ५० लाख
असे ६ हप्ते मिळून एकूण ४ कोटी रुपये वेळोवेळी घेतले. २०२० -२०२१ मध्ये गुंतवणुकीसाठी त्याने हे पैसे घेतले होते.
मात्र, त्यांना काहीही मोबदला न देता त्यांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली.
फिर्यादी या पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या.
शेख याने फिर्यादी यांना बेडरुममध्ये बोलावून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याबरोबर अनैसर्गिकरित्या शरीरसंबंध ठेवले.
इतर आरोपींनी फिर्यादी व शेख यांचे नग्न अवस्थेतील फोटो व शरीरसंबंध करतानाचे व्हिडिओ शुटिंग काढले.
फिर्यादी यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station – Woman raped at gunpoint; Atrocities committed for demanding return of 4 crores invested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत