Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – अमरजीत गोयलचा ब्लेडने वार करून खून, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News | जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्याच्या रागातून एकाने गळ्यावर ब्लेडने वार करुन तसेच डोक्यात मारुन खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) राम श्रीमंत वाघमारे Ram Shrikant Waghmare (वय २०, रा. वारजे पुलाजवळ, फुटपाथवर, वारजे) याला अटक केली आहे. अमरजीत जगन्नाथ गोयल Amarjeet Jagannath Goyal (वय ५०, रा. वारजे पुलाजवळ, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलीस नाईक राहुल कदम (Police Rahul Kadam) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. १८१/२३) दिली आहे. ही घटना वारजे पुलाजवळी (Warje Bridge Pune) पृथक बराटे गार्डनसमोर (Late Pruthak Barate Garden) शनिवारी रात्री ११ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पुलाजवळील बराटे गार्डनसमोर फुटपाथ एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर निलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली. अमरजीत गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर रहात होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्याच्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यात वाघमारे याने त्याला मारहाण करुन ब्लेडने वार केले. त्यात गोयल याचा मृत्यु झाला.

 

घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके (Sr PI DS Hake),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe),
सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबर (API Babar),
उपनिरीक्षक मनोज बागल (PSI Manoj Bagal),
पोलिस उपनिरीक्षक काळे (PSI Kale),
पोलिस उपनिरीक्षक पार्वे यांच्यासह आदींनी भेट दिली.
सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Warje Malwadi Police Station – Amarjit Goyal stabbed to death, one arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पुण्यातील बड्या बिल्डरच्या बंगल्याचे लॉक तोडून 79 लाखाची चोरी,
सेनापती बापट रस्त्यावरील घटना

Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा?, शरद पवार म्हणाले…

NCP MLA Rohit Pawar | ‘मी पुन्हा येईल हे आघाडीसाठी नसून…’ फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले…

Ajit Pawar | ‘मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क’, अजित पवारांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली