Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पुण्यातील बड्या बिल्डरच्या बंगल्याचे लॉक तोडून 79 लाखाची चोरी, सेनापती बापट रस्त्यावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बिल्डरच्या (Builder In Pune) बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचा लॅच लॉक तोडुन आत प्रवेश करून तब्बल 78 लाख 93 हजार रूपयाचा ऐवज चोरून (Pune Theft News) नेल्याची घटना शनिवारी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील (SB Road Pune) मंगलवाडी सोसायटीमधील (Mangalwadi Society) राजविला बंगलोमध्ये घडली आहे. बिल्डरच्या बंगल्यावर सेक्युरिटी गार्ड (Security Guard ) असणार्‍याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

 

बिल्डर प्रीतम राजेंद्र मंडलेचा Pritam Rajendra Mandlecha (35, रा. प्लॉ नं. 13, राजविला बंगलो, मंगलवाडी सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) यांनी यासंदर्भात चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सेक्युरिटी गार्ड झंकार बहादुर सौद (मुळ रा. नेपाळ) आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, झंकार बहादुर सौद हा गेल्या दोन महिन्यांपासुन बिल्डर प्रीतम मंडलेचा (Builder Pritam Mandlecha) यांच्या बंगल्यावर सेक्युरिटी गार्डचे काम करत होता. आपण मोबाईल वापरत नसल्याचे त्याने बिल्डर मंडलेचा यांना सांगितले होते. शनिवारी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान झंकार सौद आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मंडलेचा यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला.

त्याने बंगल्यातील 10 लाख 50 हजार रूपये रोख, 2 लाख रूपये किंमतीच्या 5 सोन्याच्या अंगठया, 3 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या सोनसाखळया, 2 लाख 80 हजार रूपये किंमतीचे हातातील सोन्याचे कडे, 4 लाखाचे ब्रेसलेट, 2 लाखाच्या बांगडया, 10 लाखाची सोन्याची बिस्कीटे, 16 लाख रूपयांचा कुंदनहार सेट, 8 लाखाचा कुंदनहार सेट, 4 लाखाचा हार, 2 लाखाच्या बांगडया, 80 हजाराचा सोन्याचा सेट, 80 हजाराचे डायमंड पेंडड, 2 लाखाचे डायमंड मंगळसुत्र,80 हजाराचा निळा पाचू, 4 लाखाचे नेकलेस, 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची लहान मुलाच्या गळयातील चेन, 2 लाख 80 हजाराचे झुमके, 3 हजाराचे चांदीचे पैंजण, 1 लाख 20 हजार रूप्ये किंमतीचे कडे आणि 80 हजार रूपये किंमतीच्या 2 अंगठया असा एकुण 78 लाख 93 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. (Pune Gharphodi)

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त शशीकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare), पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman),
पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक (PSI Nileshkumar Mahadik), पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके (PSI Rupesh Chalke) आदींनी घटनास्थळी भेट दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कोळी (API Santosh Koli) यांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Chatushringi Police Station – Theft of 79 lakhs by breaking the lock of Badya Builder’s bungalow in Pune, incident on Senapati Bapat Road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’