Ajit Pawar | ‘मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क’, अजित पवारांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी रत्नागिरीत झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरे यांच्या टीकेला अजित पवार यांनी आज सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) आज बारामती येथे आले होते. त्यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

मिमिक्री (Mimicry) करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार यांची मिमिक्री करणे, अजित पवार यांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल, तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. तसेच मनसेचा इतिहास काढत घटलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्याकडे तुम्ही लक्ष द्या असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा पाणउताराच केला.

 

अजित पवार पुढे म्हणाले, राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरे काय जमते. मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेमधून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर त्यांचे 14 आमदार निवडून आले होते. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरद सोनवणे (Sharad Sonwane) यांनी मागच्या विधानसेभेमध्ये त्यांच्याकडे तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला. नंतर 2019 मध्ये कल्याणच्या आमच्या सहकाऱ्याने त्यांची पाटी लावली म्हणून पुन्हा एकदा एक आमदार आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारांची मिमिक्री करणे, अजित पवारांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा, असा चिमटा अजित पवारांनी काढला.

 

काय म्हणाले राज ठाकरे?
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना खरंच राजीनामा द्यायचा होता,
पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ऐ तू गप्प बस… ऐ तू शांत रहा…’ हे रुप पाहून शरद पवारांना वाटलं असेल,
की उद्या हा मलाच ‘ऐ तू गप्प बस.. ऐ तू शांत रहा…’ म्हणेल, म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा,
असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला होता.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar reaction on raj thackeray mimicry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’