Pune Crime News | पुणे-कोंढवा क्राईम न्यूज : बिल्डरला कारवाईची धमकी देवून 51 लाखाची फसवणूक, खंडणी प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढव्यातील बांधकाम व्यावसायिकास (Builder In Pune) चालु बांधकामावर विविध विभागांच्या कारवाईच्या धमक्या देवून तसेच इतर कारणांसाठी एकुण 51 लाख 50 हजार रूपये घेवून फसवणूक (Cheating Case) केल्या प्रकरणी तसेच साडे तीन लाख रूपयांची खंडणी (Extortion Cases) मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) पारगेनगर कोंढवा खु. (Parge Nagar Kondhwa Khurd) मध्ये राहणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

शफी पठाण आणि समीर पठाण (दोघे रा. पारगेनगर, कोंढवा खु. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2017 पासुन आजपर्यंत फिर्यादीच्या बांधकाम साईटवर वेळावेळी जावून बांधकाम विभाग तसेच महसुल विभागातर्फे कारवाई करण्याची धमकी दिली. आरोपीने स्वतःचा वाढदिवस आणि महिला दिनी साडी वाटप कार्यक्रमासाठी तसेच जमीन खरेदीसाठी तर आरोपी समीर पठाणने पत्नीस पोटगी देण्यासाठी फिर्यादीकडून रोख रक्कम घेतली. फिर्यादीच्या विरूध्द केलेला तक्रारी अर्ज मागे घेतो तसेच मनपाच्या विविध परवानग्या काढून देतो असे सांगुन, पुन्हा शासकीय नियमानुसार बांधकाम करून नियमीत करणेसाठी 40 लाख रूपये मागुन फिर्यादीचे बांधकाम नियमीत न करता त्यांच्याकडून घेतलेली रक्कम स्वतःसाठी इनोव्हा गाडी घेण्यासाठी वापरली. (Pune Crime News)

 

आरोपींनी फिर्यादीकडून एकुण 51 लाख 50 हजार रूपये घेवून त्यांची फसवणूक केली तसेच आणखी 3 लाख 50 हजार रूपये मागितले.
नाही दिले तर बांधकाम करू देणार नाही अशी धमकी दिली.
फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शफी पठाण आणि समीर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे (API Shinde) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Kondhwa Crime News: Fraud of 51 lakh by threatening the builder with action, case against two in case of extortion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी