Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बँकांमध्ये सवज टिपणारी हरियाणाची टोळी जेरबंद; राज्यासह परराज्यातील 19 गुन्ह्यांची उकल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बँकेतून पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून विश्वास संपादित करुन चलाखीने त्यांच्याकडील रोकड लुटणार्‍या टोळीला लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी Deepakkumar Omprakash Mehangi (वय 47, रा. पानीपत, हरियाना), सुनिल रामप्रसाद गर्ग Sunil Ramprasad Garg (वय 37, रा. पानीपत, हरियाना), सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी Surajkumar Omprakash Mehangi (वय 29, रा. हरियाना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही मुळचे हरियाना (Haryana) येथील राहणारे आहेत. त्यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरे, परराज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असून त्यांच्याकडून १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून आरोपी फसवणूक करायचे. राज्यासह परराज्यात देखील अशाप्रकारचे काही गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

 

 

पुण्यातील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत (Indusind Bank) 13 जून रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडला होता. फिर्यादी हे ढोले पाटील रोडवरील (Dhole Patil Road) एका कंपनीत कामाला आहेत. त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने बँकेतून 3 लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. त्यांनी बँकेतून पैसे काढले. रोकड बँगेत ठेवत असताना कॅश काऊंटरजवळ उभा असलेल्या एकाने त्यांना पेन्सिलने खुणा केलेल्या व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे, असे सांगितले. त्यांना तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले. ते घेऊन तो नजर चुकवून पसार झाला होता.

 

लष्कर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन दिपककुमार याला त्याच्या साथीदार सुनिल याच्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरजकुमार यालाही अटक करण्यात आली.

 

या तिघांनी मिळून राज्यातील विविध शहरांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

 

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे (ACP R.N. Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके (PI Priyanka Shelke), पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे (PSI Mahendra Kamble), पोलीस अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोर्‍हाडे, रमेश चौधर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Web Title :  Pune Crime News | Pune lashkar Police arrests Haryana gang for tipping banks; Solving 19 crimes in the state including outside the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा