Pune Crime News | पुणे : चोरट्यांकडून बंद घरे टार्गेट; तीन घरफोड्यांमध्ये 15 तोळे सोन्याचे दागिन, 105 ग्रॅम चांदी अन् रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील विविध भागांत झालेल्या तीन घरफोड्यांत (House Burglary) चोरट्यांनी 15 तोळे सोन्याचे दागिने, 105 ग्रॅम चांदीसह रोख रक्कम असा एकूण पावणे पाच लाखांचा ऐवज चोरी केला आहे. चोरट्यांनी बंद असलेल्या घरांना टार्गेट करुन चोरट्यांनी या चोऱ्या केल्या आहेत. याप्रकरणी विश्रामबाग, विश्रांतवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

शनिवार पेठेत राहणारे संतोष धोंडु कदम (वय-42) यांचे राहते घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील 62 हजार 500 रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 105 ग्रॅम चांदी तसेच 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 82 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी पावणे एक ते सव्वा एकच्या दरम्यान मोतीबागे जवळ असलेल्या गुरुप्रसाद सोसायटीत घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विश्रांतवाडी कळस येथील आदमानी चाळीत राहणारे हरिभाऊ नारायण बेलदरे (वय-58) यांचे राहते घर बंद असताना चोरट्यांनी पाठिमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 29 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. याप्रकरणी, बेलदरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शुक्रवारी (दि.24) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.

मांजरी कुमार मेडोज येथे राहणारे विक्रमराज प्रल्हादराज आचार्य (वय-37) यांच्या
राहत्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
आचार्य यांनी लक्ष्मीपुजनाकरीता ठेवलेले 2 लाख 52 हजार रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.
हा प्रकार 14 नोव्हेंबर रात्री 11 ते 15 नोव्हेंबर सकाळी 8.30 दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून जीवे मारण्याची धमकी, परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी FIR