Pune Crime News | पुणे : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून जीवे मारण्याची धमकी, परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी एका भंगार व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. तसेच हतातील धारदार हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी एकावर हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.25) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील लेन नं. 5 येथील गजानन महाराज मंदिराजवळ घडला. (Pune Crime News)

याबाबत राम लौटन यादव (वय-45 रा. लेन नं. 5, गजानन महाराज मंदिराजवळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अजय मौजन याच्यावर आयपीसी 452, 504, 506/2 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाची आणि आरोपीची भांडण झाले होते. आरोपीने दुकानात येऊन फिर्यादी यांच्या भावावर धारदार हत्याराने वार करुन जबरदस्तीने पैसे काढून नेले होते. हा प्रकार सप्टेंबर 2023 मध्ये घडला होता. याप्रकरणी आरोपी अजय मौजन याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Pune Crime News)

शनिवारी दुपारी फिर्य़ादी हे त्यांच्या लक्ष्मी रद्दी बुकडेपो या दुकानात गोळा झालेले भंगार जमा करत होते.
त्यावेळी आरोपी जबरदस्तीने दुकानात आले. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे
नाहीतर धारदार हत्याराने जीवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपीने हातातील धारदार हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे (PSI Kamthe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ऑनलाइन 4 लाखांची फसवणूक

मिलिटरीमध्ये असल्याचे भासवून नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक, पुण्यातील प्रकार