Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन एकाच्या डोक्यात फरशी मारून केले जखमी, सराईत गुन्हेगारांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाचा धक्का लागल्याने त्याला बेदम मारहाण करुन डोक्यात सिमेंट ब्लॉक व फरशी मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.10) नारायण पेठेतील (Narayan Peth Pune) लोखंडे तालीम गणपतीच्या (Lokhande Talim Ganpati) समोरील पटांगणात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

याबाबत तुषार राजेंद्र भोसले (वय-33 रा. शुक्रवार पेठ, पुणे) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिपक उर्फ सदानंद वसंत जंगम (वय-33), उमेश वसंत जंगम (वय-27 दोघे रा. नारायण पेठ, पुणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिपक उर्फ सदानंद जंगम व उमेश जंगम हे सराईत गुन्हेगार आहेत. दिपक याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर उमेश याच्यावर विश्रामबाग, पार्वती (Parvati) , सिंहगड रोड (Sinhagad Road), वारजे (Warje Malwadi), स्वारगेट (Swargate), फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) 19 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार भोसले हे बाजीराव रोड येथून जात असताना लोखंडे तालीम गणपतीच्या
समोरील पटांगणात सदानंद जंगम व त्याचा मित्र विकी घोलप हे शिवीगाळ करताना दिसले.
त्यांच्यामध्ये भांडण सुरु असल्याचा गैरसमज होऊन तुषार भांडण सोडवण्यासाठी गेले.
त्यावेळी तुषारचा धक्का सदानंद याला लागल्याने त्याने तुषारला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
यावेळी तुषारचे मित्र ओंकार यादव व तेजस लोखंडे यांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवले.

भांडण सोडवले असताना सदानंद याने त्याचा भाऊ उमेश याला बोलावून घेतले.
आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत पुन्हा हाताने मारहाण केली.
तसेच उमेश याने त्याठिकाणी पडलेल्या सिमेंट ब्लॅक व फरशीने तुषारच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Yerawada Crime | पुणे : पाठलाग करुन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, तरुणावर FIR

Baramati Lok Sabha Election 2024 | मोदींना ‘मनसे’ पाठिंबा, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंना नोटीस, चुकीचा इतिहास आणि अयोग्य धार्मिक माहिती जनमानसात पसरवली, ”शाळकरी मुलांनाही समजते ते….”