Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर (Royal Challenge Bangalore) यांच्यामध्ये चालू असलेल्या आयपील (IPL-2023) क्रिकेट मॅचवर सट्टा (Betting) घेणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch Unit-3) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) येरवडा येथील गुंजन टॉकीज जवळ गुरुवारी (दि.6) केली. दरम्यान, पुण्यातील काही मोठे बुकी पुणे शहर पोलिसांच्या रडारवर आहेत.

 

आकाश धरमपाल गोयल Akash Dharampal Goyal (वय 30 वर्षे रा. सर्वे नंबर 93 लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचेन नाव आहे. गुन्हे शाखेचे ACP सुनील पवार, युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior PI Shrihari Bahirat) यांना माहिती मिळाली की, इंडियन प्रीमियर लीगच्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर यांच्यामध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅच वर आकाश गोयल हा सट्टा घेत आहे. आरोपीचा शोध घेत असताना त्याला येरवडा येतील गुंजन टॉकीज जवळून ताब्यात (Pune Crime News) घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सट्टा घेऊन तो पुढे महादेव बुक या क्रिकेट अॅप्लीकेशन मार्फत पुढे फिरवत असल्याची कबुली दिली. आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) महाराष्ट्र जुगार अधिनियम (Maharashtra Gambling Act) कलम न12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर, पोलीस  हवालदार शरद वाकसे, पोलीस अंमलदार सुजित पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राले, सोनम नेवसे , भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime branch arrests bookie for betting on IPL;
Other bookies in Pune on police ‘radar’


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Department of Registration and Stamps Pune | मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही,
विरोधानंतर नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा !
रायगड इलेव्हन संघाने विजयासह उघडले गुणांचे खाते

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान