Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! रायगड इलेव्हन संघाने विजयासह उघडले गुणांचे खाते

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद एकदिवसीय (५० षटके) क्रिकेट स्पर्धेत गणेश जोशी याच्या ८४ धावांच्या जोरावर रायगड इलेव्हन संघाने सिंधुदूर्ग इलेव्हन संघाचा ५६ धावांनी पराभव करून स्पर्धेत पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)

 

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड इलेव्हनने ३८.५ षटकामध्ये २०९ धावा धावफलकावर लावल्या. गणेश जोशी याने ७० चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. श्रेयस काकडे याने ५३ धावांची खेळी करून दुसर्‍या बाजूने योग्य साथ दिली. गणेश आणि श्रेयस यांनी चौथ्या गड्यासाठी ७२ चेंडूत ७८ धावांची खेळी करून संघाला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. सिंधुदूर्ग संघाच्या ओंकार एम. याने ३७ धावात ५ गडी टिपत रायगड संघाच्या डावाला वेसण घातले.

 

या आव्हानाचा पाठलाग करताना सिंधुदूर्ग इलेव्हनचा डाव ४०.१ षटकात आणि १५३ धावांवर संपुष्टात आला. ओंकार पेटकर (३५ धावा) आणि प्रभदीप सिंग (२४ धावा) यांनी छोटी खेळी करून संघाकडून प्रतिकार केला. दिग्विजय पाटील याने २३ धावात २ गडी बाद केले.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

 

रायगड इलेव्हनः ३८.५ षटकात १० गडी बाद २०९ धावा (गणेश जोशी ८४ (७०, १२ चौकार, ३ षटकार), श्रेयस काकडे ५३ (४९, ५ चौकार, ३ षटकार), शिवम यादव २१, ओंकार एम. ५-३७, शुभम नायडू ३-४१);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी गणेश आणि श्रेयस यांच्यात ७८ (७२) वि.वि. सिंधुदूर्ग इलेव्हनः ४०.१ षटकात १० गडी बाद १५३ धावा (ओंकार पेटकर ३५, प्रभदीप सिंग २४, दिग्विजय पाटील २-२३); सामनावीरः गणेश जोशी;

 

Web Title :- Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘Vision Cup’ Championship Cricket Tournament!
Raigad XI opened the points account with a win


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! हेज् अँड सॅचे्,
हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत

MNS MLA Raju Patil | ‘नशीबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’,
मनसे आमदार राजू पाटलांचा खा. श्रीकांत शिंदेंना टोला