Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अमोल कोल्हे यांच्या एका भाषणाची क्लिप व्हायरल करुन ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याचा चुकीचा अर्थ काढू नये असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. परंतु आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आगामी काळात शिरूर मधील राजकीय समीकरणं (Pune Political News) बदलणार का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे.

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्याबाबत सूचक विधान केलं. चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीत शिंदे गट (Shinde group) आणि भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याविषयी (Pune Political News) भाष केल. सध्या शिंदे गटाकडे 39 अधिक 10 म्हणजे 49 संख्याबळ आहे. विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) त्यांना तेवढ्यावरच थांबवायचं असा कोणताही विषय कोणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळेंनाही तसं म्हणायचं नव्हतं. मात्र त्यावर आत्ताच निर्णय घेता येणार नाही. सर्वे होतील, बैठका होतील, मतमतांतरं होतील, नवी माणसं येतील, असं पाटील म्हणाले.

 

तर आढळरावांना…

अमोल कोल्हे भाजपात आले, तर पुढे काय होणार? याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, आढळरावांसारखा (Shivajirao Adhalarao Patil) तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. पण मग कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) निवडणूक लढवायची की भाजपकडून काढायची? असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.

 

लोकसभेची चर्चा डिसेंबरमध्ये

लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या (Lok Sabha Elections) सगळ्या चर्चा डिसेंबर मध्ये सुरु होतील, असंही पाटील म्हणाले. लोकसभेसंदर्भातले सगळे विषय डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरु होतील. विधानसभेचे विषय तर लोकसभेच्याही निकालानंतर सुरु होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  Pune Political News | chandrakant patil hints what if amol kolhe ncp joins bjp adhalrao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा