Department of Registration and Stamps Pune | मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही, विरोधानंतर नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Department of Registration and Stamps Pune | वेगवेगळ्या कारणांसाठी खरेदी करण्यात येणारे 100 आणि 500 रुपयांचे मुद्रांक खरेदी करण्यासाठी आता प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अट अखेर प्रखर विरोधानंतर मागे घेण्यात आली आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक (IG) व मुद्रांक नियंत्रक (Department of Registration and Stamps Pune) श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी हे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात हा निर्णय केवळ मुंबईपुरताच लागू करण्यात आला होता.

 

पूर्वी मुद्रांक खरेदी ही अर्जदाराच्या वतीने नातेवाईक किंवा मित्र कोणीही खरेदी करु शकत होते. परंतु 1 एप्रिलनंतर ज्यांना मुद्रांक पाहिजे आहे त्या व्यक्तीने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक सतीश देशमुख (Additional Controller of Stamps Satish Deshmukh) यांनी काढले होते. याची अंमलबजावणी 3 एप्रिल पासून सुरु झाली. परंतु या निर्णयाला वकील संघटनांनी (Bar Associations) तिव्र विरोध केला आणि मुद्रांक खरेदीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे 3 एप्रिलला मुंबईत मुद्रांक खरेदी झाली नाही. या निर्णयावर नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. (Department of Registration and Stamps Pune)

या निर्णयामुळे मुद्रांक खरेदी करताना विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
खरेदीदारांची गैरसोय होऊ लागली होती. महिला,
ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी त्रास सहन करावा लागत होता.
याची तातडीने दखल घेत श्रावण हर्डीकर यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ‘हस्ते’ पद्धतीने मुद्रांक खरेदी विक्री करता येणार आहे.

 

Web Title :- Department of Registration and Stamps Pune | order of the inspector general of registration that physical presence is not required for purchase of stamps


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! हेज् अँड सॅचे्,
हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत

MNS MLA Raju Patil | ‘नशीबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’,
मनसे आमदार राजू पाटलांचा खा. श्रीकांत शिंदेंना टोला

Maharashtra Politics News | जर शिंदे-ठाकरे एकत्र येण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेतला तर…, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

Pune Crime News | खेड : पुर्ववैमनस्यातून 6 जणांकडून युवकाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून