Pune : पतीसोबत अनैतिक संबंध ठेवणार्‍या महिलेने घेतला चावा, FIR दाखल

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन –   पतीसोबत अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेला पत्नीने समज दिली. मात्र, त्यानंतर अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेने कहरच केला. ज्याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत, त्या पुरुषांच्या पत्नीलाच कडाडून चावा घेतला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. हिंजवडी परिसरात ही घटना घडली आहे. यात महिला जखमी झाली झाली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यापासून फिर्यादी महिलेच्या पतीचे आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. फिर्यादीने पतीला आणि त्या महिलेला एकदा रंगेहाथ पकडले होते. तसेच फिर्यादीने त्या महिलेला अनेकदा समज दिली होती. मात्र, त्यांचे अनैतिक संबंध सुरूच होते. त्यामुळे फिर्यादीने आरोपी महिलेला तिच्या पतीला फोन लावण्यास सांगितला होता. यावरून दोघात वाद झाला अन् आरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या उजव्या हातास कडाडून चावा घेतला. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.