Pune Crime News | अपहरण करुन खंडणी मागणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड, 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल (Pistol) बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी (Extortion Case) वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. (Pune Crime News)

अंकुश महादेव पाबळे (वय-26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली श्रीकांत पाबळे (वय-25 दोघे रा.कावळ पिंपरी ता. शिरुर), विशाल उर्फ आण्णा शिवाजी माकर (वय-23 रा. ढोकसांगवी ता. शिरुर), दिलीप रामा आटोळे (वय-45 रा. जांबुत दुडेवस्ती ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिलीप आटोळे याचा वाळूचा व्यवसाय आहे.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिक लियाकत नुरइस्लाम मंडल (वय-54 रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचे
अपहरण (Kidnapping) केले. त्यांना मारहाण करुन बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर वाळू आमच्याकडून घ्यायची तसेच दहा लाख रुपयांची खंडणी मागीतली. त्यावेळी आरोपीने पिस्टल मंडल यांच्या डोक्याला लावले. घाबरलेल्या मंडल यांनी एक लाख रुपये देण्याचे कबुल केले. आरोपींनी मंडल यांच्या मुलाकडून एक लाख रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडले. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 सप्टेंबर रोजी घडला होता. (Pune Crime News)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी भीमा कोरेगाव येथे येणार असून ते मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम, लाकडी दांडके जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे
(Additional SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
(PI Avinash Shilimkar), शिरुर पोलीस ठाण्याचे (Shirur Police Station) पोलीस निरीक्षक संजय जगताप
(PI Sanjay Jagtap), एलसीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे (PSI Ganesh Jagdale),
पोलीस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेस नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव,
मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हेमंत विरोळे, धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके,
शिरुर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार (PSI Abhijit Pawar), पोलीस अंमलदार जी.एन. देशमाने,
नितीन सुद्रीक, बाळू भवर, एन. जगताप, व्ही. मोरे, एन. थोरात. ए. भालसिंग, आर. होळनोर,
पी. देशमुख यांच्या पथकाने केली आहे. आरोपींना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लेखक राजन खान यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Pune News | पुणे रेल्वे स्थानकात ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे १२० सीसी टीव्ही कॅमेरे, आरोपी ओळखून देणार माहिती, जाणून घ्या…