Pune Crime News | पुणे-वानवडी क्राईम न्यूज : एफ एल 2 चे लायसन्स विकत देण्याच्या आमिषाने मद्य विके्रत्याची 52 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घाटकोपर Ghatkopar (मुंबई, पुर्व) येथील एका मद्य विक्रेत्याची एफ एल 2 चे लायसन्स (FL 2 License Maharashtra) विक्री करण्याच्या बहाण्याने सात जणांनी मिळून तब्बल 52 लाख रूपयांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. आरोपींनी 52 लाखांपैकी 9 लाख रूपये परत दिले आहेत मात्र उर्वरित रक्कम परत दिलेली नाही. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

अमित खट्टर (Amit Khattar Jalna), देवेंद्र उर्फ देवा खट्टर Devendra Alias Deva Khattar (दोघे रा. जालना), चंद्रप्रकाश फुलचंद मौर्या Chandraprakash Phulchand Maurya (32, रा. भिवंडी), गिरीराज म्हाळू गरांडे Giriraj Mhalu Garande (40, रा. मुंबई – Mumbai) यांच्यासह इतर तिघांविरूध्द कट रचून फसवणूक केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर येथील पंतनगरमध्ये राहणार्‍या एका मद्य विक्रेत्याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी आपआपसात संगणमत करून
एस ए शेख अ‍ॅन्ड कंपनीचे भोर येथील एफ एल 2 चे लायसन्स विक्री करायचे असुन ते फिर्यादीला मिळवुन देण्याचे आमिष दाखविले.
एस ए शेखचे मालक शहजादी शेख, अजीमुद्दीन शेख व मोहसिना शेख यांच्या ऐवजी आरोपींनी बनावट व्यक्तींना उभे करून
बनावट आधार कार्ड देवुन बनावट एमओयु (सामंजस्य करार) करून फिर्यादीकडून 52 लाख 1 हजार रूपये घेतले.
आरोपींनी त्यापैकी 9 लाख रूपये परत केले. राहिलेली रक्कम आरोपींनी परत केली नाही
त्यामुळे अप्पर पोलिस आयुक्तांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट-5 चे पोलिस उपनिरीक्षक लोहोटे करीत आहेत. (Pune Crime News)

 

सदरील गुन्हा हा पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेसकोर्टच्या (Pune Race Course) मेनगेट येथे घडल्याने पुण्यात दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Wanwadi Crime News : Liquor seller cheated of 52 lakhs by luring him to sell license of FL2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी