Pune Crime News | पुण्यात निवृत्त कर्नलची फसवणूक, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला (Retired Army Colonel) अज्ञात क्रमांकावरून एक व्हिडिओ कॉल (Video Call) आला आणि काही सेकंदासाठी तो कॉल उचलल्यामुळे ही व्यक्ती मोठ्या संकटात सापडली. सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) त्यांच्याकडून ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये उकळले. (Cheating Fraud Case) यानंतर सदर व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते पुण्यातील वाघोलीत राहतात. एक दिवस त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. तो कॉल उचलताच पलिकडे एक तरुणी कपडे काढताना दिसली.

फिर्यादी यांनी व्हिडीओ कॉल लगेच बंद केला. हा प्रकार सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. (Pune Crime News)

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सायबर गुन्हेगारांनी वेगळ्या क्रमांकावरून पुन्हा फिर्यादीला फोन करून दिल्ली पोलीस बोलत असल्याचे सांगितले.
तुमचा व्हिडीओ आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर व्हायरल झाला तर खूप बदनामी होईल
त्यामुळे तत्काळ ते व्हिडिओ डिलीट करून घ्या असे पलिकडील व्यक्ती म्हणाला.

यानंतर फिर्यादी यांनी व्हिडीओ डिलिट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख ७४ हजार २३२ रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे (PI Seema Dhakne) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

वानवडी परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत स्थानबध्दतेच्या 58 कारवाया