पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तीन व चार चाकी गाड्यांची विमा पॉलिसी (Vehicle Insurance) उतरविताना त्या दुचाकी असल्याचे भासवून एका एजंटने (RTO Agent Pune) २९ गाड्यांचा विमा उतरविला. त्याद्वारे कंपनीची सह आर टीओची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. (Pune Crime News)
याप्रकरणी अभिजित शशिकांत मोरे (वय ४०, रा. हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station (गु. रजि. नं. १९३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण काशिनाथ रेड्डी Laxman Kashinath Reddy (रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रोड) व इतर वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा येथील कॉमर्सझोनमधील बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्समध्ये (Bajaj Allianz General Insurance) २०१८ ते २०२१ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने फिर्यादी यांनी लक्ष्मण रेड्डी यांना विमा पॉलिसी उतरवण्यासंदर्भात पी ओ एस दलाल म्हणून नेमणूक केली.
तसा करारनामा केला होता. गाडीचा विमा उतरविताना तीन व चारचाकी गाड्यांना जास्त विमा रक्कम भरावी लागते.
अशी जादा रक्कम भरावी लागू नये, म्हणून त्याने वेगवेगळ्या चार व तीन चाकी वाहनधारकाकडून प्रिमियम रक्कम घेतली.
परंतु, त्यांची वाहने दुचाकी असल्याचे दर्शविले. त्याप्रमाणे दुचाकीच्या प्रिमियमची रक्कम भरली.
कंपनीचा विश्वासघात करून कंपनीची ४ लाख २० हजार ३१८ रुपये तसेच राज्य व केंद्र सरकारची सुमारे ७६ हजार २६० रुपयांची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक काटे (PSI Kate) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | RTO agent’s maximum three and four wheeler cars shown two wheeler! Along with the RTO, Bajaj Allianz company was also accused
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले