Pune Crime News | अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता असल्याचे सांगुन फसवणूक, कोंढव्यातील महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता व सभासद असल्याचे सांगुन पुनावाला यांच्या संस्थेमार्फत 5 लाख रूपयाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष दाखवुन (Lure Of Loan) एका महिलेने तिघांची फसवणूक (Cheating Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेविरूध्द मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये (Marketyard Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

सकीना तायर पुनावाला Sakina Taher Poonawalla (32, रा. वेलकम हॉल, फ्लॅट नं. 4, कोंढवा – Kondhwa, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश दंडाप्पा बजलोर (40, रा. आंबेडकर नगर) यांनी मार्केयार्ड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना सकीना पुनावाला ही त्यांच्या घरी गेली. तिने आपण अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता आणि सभासद असल्याचे त्यांना सांगितले. पुनावाला यांच्या सेवाभावी संस्थेकडून 5 लाख रूपयायाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष तिने फिर्यादीला दाखविले. (Pune Crime News)

सकीना पुनावाला हिने फिर्यादीकडून नगछी 17 हजार रूपये, इरफान शेख यांच्याकडून 25 हजार रूपये आणि
एका महिलेकडुन 17 हजार रूपये रोख स्वरूपात घेतले. सकीनाने तिघांना बँक ऑफ बडोदाचा (Bank of Baroda)
बनावट चेक देवुन एकुण 59 हजार रूपयाची फसवणूक (Fraud Case) केली.
दरम्यान, फिर्यादीने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सकीना पुनावाला हिला मंगळवारी दुपारी अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यास नेण्यात
आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले (PSI Chetan Bhosale) यांनी दिली आहे.

Web Title :  Pune Crime News | Sakina Taher Poonawalla arrested from Kondhwa for cheating by claiming to be a worker of Adar Poonawalla’s Seva Bhavi organization

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajay Devgn And Kajol | घरात कोणाचं चालतं या प्रश्नावर अजय देवगणने दिले काजोल समोर ‘हे’ उत्तर

Palkhi Sohala 2023 | ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा शुभारंभ

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी