Pune Crime News | समर्थ पोलिसांकडून नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये मोबाईल चोरणार्‍याला अटक, तब्बल 29 स्मार्ट फोन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान संपुर्ण शहरात कोम्बींग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबविले होते. कोम्बींग ऑपरेशनमध्ये समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) नाना पेठेतील (Nana Peth Pune) मच्छी मार्केटमध्ये मोबाईल चोरी (Mobile Theft) करणार्‍या परप्रांतीयास अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे तब्बल 29 स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

 

कुंदनकुमार अर्जुन माहातो Kundan Kumar Arjun Mahanto (25, रा. नयाटोला, कल्याणी महाराजपुर बजार, जि. साहेबगंज. पोलिस ठाणे – तलझाडी. राज्य झारखंड. सध्या रा. मुंबई, अंधेरी चकाला मरूग पाईपलाईन, साईबाबा मंदिराजवळ, मुंबई़ – Mumbai) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन सुरू असताना पोलिस हवालदार रोहिदास वाघीरे (Police Rohidas Waghire) आणि पोलिस हवालदार जितेंद्र पवार (Police Jitendra Pawar)यांना एक जण नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये संशयास्पद उभा असल्याची माहिती मिळाली होती. (Pune Crime News)

 

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी आलेल्यांचे मोबाईल चोरून परराज्यात विकत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे एकुण 29 स्मार्ट फोन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. (Pune Police Recover 29 Smart Phones)

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal), वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे (Sr PI Suresh Shinde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे (PSI Sunil Randive), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस हवालदार रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलिस नाईक रहिम शेख, पोलिस अंमलदार कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Samarth police arrested a mobile phone thief in the fish market of
Nana Peth, as many as 29 smart phones were seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bollywood Movie | सनी देओल व अक्षय कुमारची होणार बॉक्सऑफिसवर टक्कर; दोन्ही सिक्विल होणार एकाच दिवशी प्रदर्शित

Ayurvedic Herbs To Control Diabetes | शुगर करायची असेल कंट्रोल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 10 धारदार हत्यारे, पिस्टल, काडतुसे जप्त