Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 10 धारदार हत्यारे, पिस्टल, काडतुसे जप्त

1832 गुन्हेगारांच्या चेकिंगमध्ये 639 सराईतांची झाडाझडती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police Stations In Pune) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) वतीने ऑल आऊट (All Out Combing Operation) कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.3) रात्री 10 ते मंगळवार (दि.4) मध्यरात्री दोन या कालावधीत राबवण्यात आले.

 

पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stops In Pune), रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 1832 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 639 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 11 आर्म अॅक्ट (Arms Act) गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक
(Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 47 हजार 400 रुपयांचे 10 धारदार हत्यारे, 1 पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

परिमंडळ 1 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई (Zone I)

 

परिमंडळ 1 मध्ये मालमत्तेविरुद्धच्या दोन गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन 5 लाख 9 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल जप्त केले आहेत. तसेच मोक्का (MCOCA) Mokka गुन्ह्यातील एक आणि चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. याशिवाय प्रोव्हिबीशन अॅक्ट (Prohibition Act) नुसार दोन केसेस करुन 1670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार अॅक्ट (Gambling Act) नुसार 4 केसेस करुन एका आरोपीला अटक करुन 6760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

परिमंडळ 2 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई (Zone II)

 

पुणे पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत परिमंडळ दोन मध्ये 5 शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल
करुन 7 जणांना अटक केली आहे. तर जुगार अॅक्ट नुसार 3 केसेस करुन 4 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 3530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्रोव्हिबीशनमध्ये 5 केसेस करुन 5 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 9520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

परिमंडळ 3 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई (Zone III)

 

परिमंडळ तीन मध्ये प्रोव्हिबीशनमध्ये 11 केसेस करुन 11 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 19,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

परिमंडळ 4 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई (Zone IV)

 

 

परिमंडळ चारमध्ये 6 गुन्हे दाखल करुन 6 आरोपींना अटक करत 8999 रुपयांचा गांजा, तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे. याशिवाय जुगार अॅक्ट प्रमाणे 14 केसेस करुन 22 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच प्रोव्हिबीशन अॅक्ट अंतर्गत 22 केसेस दाखल करुन 32,280
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

परिमंडळ 5 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई (Zone V)

 

परिमंडळ 5 मध्ये प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार 9 केसेस करुन 9 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 13,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक केली आहे.

 

विशेष मोहिमे दरम्यान प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार गुन्हे शाखेने 11 तर पोलीस स्टेशनने 49 केसेस दाखल करुन 1 लाख 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार अॅक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनने 21 केसेस दाखल करुन 82 आरोपींना अटक करुन जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर सीआरपीसी कायद्यांतर्गत (CRPC Act) 45 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली आहे. तसेच 13 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 455 हॉटेल, ढाबे व लॉज तपासण्यात आले. तसेच 85 एस टी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली. पोलिसांकडून 28 ठिकाणी नाकाबंदी करुन 3282 संशयित वाहन चालकांना चेक करुन 475 जणांवर 1 लाख 22 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
वाहतुक शाखेकडून 1129 संशयित वाहन चालकांना चेक करुन 476 जणांवर 4 लाख 8 हजार 600 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),

पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), पोलीस
उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), पोलीस
उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस
उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic DCP Vijayakumar Magar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,
अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

 

Web Title : Pune Police Combing Operation | ‘All Out Combing Operation’ by Pune Police in the city,
10 sharp weapons, pistols, cartridges seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा