Pune Crime News | पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बिर्याणी का केली नाही अशी विचारणा करत पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी आरोपी अक्षय मोहन सोनार (Akshay Mohan Sonar) याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे (Pune District and Sessions Court) न्यायाधीश एस. एस. गुल्हाने (Judge S. S. Gulhane) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सुधीर पाटील (Adv. Sudhir Patil) यांनी दिली. हा प्रकार (Pune Crime News) 10 नोव्हेंबर 2022 रोजी घडला होता.

काय आहे प्रकरण?

पत्नीने बिर्याणी का केली नाही? यावरून आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची तक्रार दत्तवाडी पोलिस स्टेशनला देण्यासाठी पत्नी तिच्या आई-वडिलांसोबत निघाली असताना गजानन महाराज मंदिराच्या मागील गेटसमोर सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी अक्षय सोनार याने फिर्यादी पत्नीला काही कळायच्या आत फिर्यादीला एका हाताने घट्ट पकडून दुसऱ्या हातातील धारदार चाकूने गळ्यावर वार (Stabbing) केले. अक्षय सोनार याने केलेल्या मारहाणीत फिर्यादी पत्नीला दुखापत झाली होती. फिर्यादी यांनी याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेवून आरोपी अक्षय सोनार याचेविरुद्ध खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करून आरोपीला अटक (Arrest) केली होती. (Pune Crime News)

आरोपी अक्षय सोनार याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अ‍ॅड. सुधीर पाटील, अ‍ॅड. अर्जुन वाघमारे (Adv. Arjun Waghmare), अ‍ॅड. विशाल वीर-पाटील (Adv. Vishal Veer-Patil), अ‍ॅड. कार्तिक दारकुंडे-पाटील (Adv. Karthik Darkunde-Patil) यांचेमार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी आरोपी अक्षय सोनार याची बाजू न्यायालयात मांडली व न्यायालयापुढे युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीच्या मारहाणीत फिर्यादीस झालेल्या जखमा ह्या साध्या असून तसे वैद्यकीय अहवालात (Medical Report) नमूद आहे. त्याचप्रमाणे पोलीस रिपोर्टमध्ये आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे कुठेही नमूद नाही. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व तिला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता. हे विविध उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपीने किरकोळ कारणावरून फिर्यादीस बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा पत्नीला मारहाण करू शकतो, म्हणून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गुल्हाने यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अ‍ॅड. सुधीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अक्षय सोनार याची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. सुधीर पाटील यांना अ‍ॅड. कार्तिक दारकुंडे-पाटील, अ‍ॅड. विशाल वीर-पाटील व अ‍ॅड. अर्जुन वाघमारे यांनी सहकार्य केले.

Web Title :Pune Crime News | Sessions Court granted bail to the accused husband in the case of murderous attack on his wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज