Pune Crime News | पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पथकाने आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या (Ayurvedic Massage Center) नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. पथकाने बनावट ग्राहक पाठवू खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित तरुणींकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करुन घेत होता. ही कारवाई मंगळवारी (दि.12) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बालाजी नगर येथील सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र (Srishti Ayurvedic Massage Treatment Center) येथे केली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजी हौसींग सोसायटी, बालाजी नगर, पुणे) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व आयपीसी 370 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय नारायण राणे (Police Constable Ajay Rane) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

बालाजी नगर येथील ग्रंथ कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र
येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती.
आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या
घटनेची पुष्टी केली आहे. त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर
स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप देशमाने (PI Sandeep Deshmane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनच्या झाडाची चोरी, दोघांना अटक

ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नगर – पुणे रोडवरील घटना

Pune Police MPDA Action | चतु:श्रृंगी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 68 वी स्थानबध्दतेची कारवाई

Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका हरपला

Comedian Santosh Chordia Passed Away | एकपात्री हास्यवी संतोष चोरडिया यांची अचानक एक्झिट; ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात