Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार, परराज्यातील तरुणावर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून मागील पाच वर्षापासून लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले. त्यानंतर लग्नास नकार देत जिवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार पुण्यातील वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2018 ते मे 2023 दरम्यान पीडित युवतीच्या घरात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 31 वर्षाच्या युवतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुरुवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितेश मनोज शुक्ला Nitesh Manoj Shukla (वय-30 रा. महाराज गंज, गोरखपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 377, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीची आणि आरोपीची 2018 मध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपी नितेश शुक्ला याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आरोपी आणि फिर्यादी हे एकाच घरात राहत होते. त्यावेळी नितेश याने पीडितेला तू दुसऱ्या जातीची आहेस, माझ्य घरातील लोक तुला सुन म्हणून स्वीकारणार नाहीत, असे म्हणून लग्न करण्यास नकार दिला. तसेच तु मला परत भेटू नको, संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे (PSI Bhade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे यांच्यासह 14 जणांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 76 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA