Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला चिपळून येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलातील सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) मोक्कातील फरारी (Abscond In MCOCA) आरोपीला रत्नागिरी जिल्हयातील चिपळुन (Chiplun, Ratnagiri) येथून अटक केली आहे. तो गेल्या 8 महिन्यांपासून फरार होता. (Pune Crime News)

सुरज संतोष ढवळे Suraj Santosh Dhavale (19, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे – Hingne Khurd) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुरज ढवळे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहेत. त्या गुन्हयातील आरोपींविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. ढवळेच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ढवळे हा गेल्या 8 महिन्यापासुन फरार होता. (Pune Crime News)

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) यांना ढवळे हा रत्नागिरी जिल्हयातील चिपळुन येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळविले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस पथकाने चिपळुन येथे जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेवून आरोपी ढवळेला अटक केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत.

पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे
(ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन
(Sr PI Abhay Mahajan), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar),
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi),
सहाय्यक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण,
सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील,
अमित बोडरे आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Advt.

Web Title :   Pune Crime News | Sinhagad Raod Police Arrest Suraj Santosh Dhavale In MCOCA Case From Chiplun Ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, भाजप नेत्याचा शरद पवारांवर ‘प्रहार’

Devendra Fadnavis | ‘एकाचवेळी औरंगजेब व टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; पण.. राहावे लागणार तुरुंगातच