Pune Crime News | पुण्यातील महिलांना आखाती देशात पाठवून फसवणूक करणाऱ्या एजंटला सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील महिलांच्या गरिबीचा आणि अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून आखाती देशात पाठवून फसवणूक करणाऱ्या मुंबईतील एजंटला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) अटक केली आहे. आरोपीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचा टुरिस्ट व्हिसा काढून त्या व्हिसावर महिलांना सौदी अरेबिया देशात पाठवल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

पुणे शहरात राहात असलेल्या महिलांच्या गरिबीचा फायदा घेऊन मुंबई येथील एजंटने महिलांना जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून टुरिस्ट व्हिसावर सौदी अरेबियात पाठवले. महिलांना घर कामासाठी सौदी अरेबिया देशात पाठवून त्या बदल्यात तेथील घरमालकांकडून मोठी रक्कम घेतली. तसेच महिलांना दरमहा ठरलेल्या पगारा पेक्षा कमी रक्कम दिली. घरकाम करणाऱ्या महिलांना तेथील घरमालकांनी गुलामासारखी वागणुक दिल्यानंतर महिलांनी एजंटकडे भारतात जाण्याची मागणी केली. त्यावेळी एजंटने त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन फसवणूक केली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) आयपीसी 370, 420, 385, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एजंटची कोणतीही माहिती नसताना मुंबई येथील माहिम परिसरात शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या एजंटला मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या
मार्गदार्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे,
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकाण, हनुमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली. (Pune Police Crime Branch)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pune Kuswali Pathar | पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण होणार जागतिक पर्यटन केंद्र,
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा
उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद