Pune Crime News | विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला केले ब्लॅकमेल; बदनामीची धमकी देऊन अश्लिल व्हिडिओ काढून 5 हजार अमेरिकन डॉलरची केली मागणी

Pune Crime News | Threat of sexually assaulting nude photos to go viral, incident in Kondhwa area; FIR against both

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्राध्यापिकेला (female Professor) व्हॉटसअप कॉल (WhatsApp Call) करुन विद्यापीठात बदनामी करण्याची भिती घालून त्यांचा अश्लिल व्हिडिओ (Pornographic Video) काढला. हा व्हिडिओ व्हायरल करुन त्यांच्याकडे 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police News) मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार – Patna, Bihar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मांजरी येथील एका 36 वर्षाच्या प्राध्यापिकेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 924/23) दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 पासून आतापर्यंत सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भिती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ कॉल इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर दुसर्‍या आयडी वरुन फिर्यादी यांना अनेक अ‍ॅडिओ व व्हिडिओ कॉल केले. आणखी एका इन्स्टाग्राम आयडीवरुन फिर्यादी व त्यांचे पतीला फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ (Nude Videos) पाठवून त्यांच्या 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार फिर्यादीच्या पतीला समजल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Student Blackmailed Professor; Threatened defamation and demanded 5000 US dollars by making an obscene video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts