Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – गाडी बुक न केल्याने गुंडाने लोखंडी रॉड डोक्यात मारुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी गाडी पाहण्यास सांगितले असतानाही न पाहिल्याने गुंडाने (Pune Criminals) एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याचा (Attempt To Murder) प्रयत्न केला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी फैजल ऊर्फ गट्या करीम शेख Faizal Alias Gatya Karim Shaikh (वय २६, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) याला अटक केली आहे. याबाबत अजीज शेरखान शेख (वय ५२, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५६/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी सकाळी ९ वाजता फिर्यादी त्यांचे मित्र करीम सय्यद याच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी फैजल तेथे आला. ‘‘मैने तुझे कल मुंबई जाने के लिए गाडी देखने को बोला था तुमने क्यु गाडी नही देखी अभी तुझे जिंदा नही छोंडुंगा,’’ असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी (Marhan) केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन शेख याला अटक केली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहे. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे (API Jamdade) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Swargate Police Station – For not booking a car,
a goon tried to kill himself by hitting an iron rod on his head

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा