Pune Crime News | अनोळखी मयताची ओळख पटण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB) आरोपींना अटक

Pune Rural Police LCB

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरुर पोलीस ठाण्याच्या (Shirur Police Station) हद्दीमध्ये न्हावरा-केडगाव रोडवरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा 29 ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला होता (Murder In Pune) . याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयत व्यक्तीची ओळख पटण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या (Pune LCB) पोलिसांनी (Pune Rural Police) गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना अटक केली आहे. (Pune Crime News)

संतोष आप्पासाहेब गाडेकर (रा. टोकवाडी ता. मंठा जि. जालना) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होते. याप्रकरणी बापू भिमाजी तरटे (वय-36 रा. पवळे खु. ता. पारनेर, जि. नगर) व निलेश माणिक थोरात (वय-26 रा. मुंगशी ता. पारनेर जि. नगर) यांना अटक केली आहे. (Pune Crime News)

शिरुर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्याचा तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना एक चारचाकी पिकअप वाहन संशयास्पद दिसून आले. पिकअप वाहन हे सुपा नाका बाजुने गेल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने सुपा टोलनाका परिसरात चौकशी केली असता मयत व्यक्ती हा टोलनाक्या जवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामाला असल्याची माहिती मिळाली.

हॉटेल सौंदर्या इन हे बापू तरटे आणि निलेश थोरात यांनी चालवण्यासाठी घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन मयत व्यक्तीचे नाव सांगितले. मयत संतोष गाडेकर हा हॉटेलमध्ये कामाला होता. त्याने हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली होती. मात्र, तो काम करत नसल्याने आरोपींनी त्याला बेदम मारहाण करुन खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पिकअप वाहनातून पारगाव पुलावरुन भिमा नदीपात्रात टाकून दिला. पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले पिकअप वाहन जप्त करुन शिरुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,
पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजु मोमीण,
चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; 2 महिलांची सुटका, भोसरी परिसरातील प्रकार

Total
0
Shares
Related Posts