Pune Crime News | स्पिकरच्या त्रासाविरोधात नागरिकानेच उठविला आवाज; साऊंड सिस्टमची केली तोडफोड, कोंढवा पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | आवाज, प्रदुषणापासून दूर राहण्यासाठी शहरापासून दूर जाऊन राहणे अनेक जण पसंत करीत असतात. मात्र, आता अशा ठिकाणीही लग्न समारंभ, पार्ट्यांच्या नावाखाली धुडगूस सुरु झाला आहे. अनेक पब, हॉटेलमध्ये पार्ट्यांच्या नावाखाली मोठ मोठ्या आवाजात स्पिकर सुरु ठेवत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र, याविरोधात शेवटी एका नागरिकाने आवाज उठविला. त्याने क्लबमध्ये शिरुन तेथील साऊंड सिस्टमच्या वायरी तोडून टाकल्या. पोलिसांनी या नागरिकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

सत्यबीर बंगा (रा. नॅती हायलँड सोसायटी, मंहमदवाडी) असे या नागरिकाचे नाव आहे.

 

याप्रकरणी अब्दुल वाहाब रिसालदार (वय ५४, रा. कोणार्क पुरम सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६१/२३) दिली आहे. हा प्रकार कोरियंथल रिसॉट अँड क्लबमधील (Corianthal Resort & Club) ग्रँड बोल्ड रुममध्ये ८ मार्च रोजी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरियंथल क्लबमधील ग्रॅड बोल्डरुममध्ये लग्न समारंभ सुरु होता. मात्र, त्यात लावलेल्या लाऊड स्पिकरचा आवाज खूप मोठा होता. याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता. सत्यबीर बंगा यांचा बाजूला बंगला आहे. लाऊड स्पिकरला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असते. तरीही क्लबमधील स्पिकर रात्री ११ वाजून गेले तरी सुरु होता. कार्यक्रम इनडोअर असला तरी त्यातील स्पिकरचा आवाजाचा त्रास बाजूच्या बंगल्यांना होत होता. त्यामुळे चिडलेले सत्यबीर बंगा हे तेथे गेले. त्यांनी साऊंड सिस्टमच्या वायरी तोडल्या. एल ए डी ऑपरेटरचा लॅपटॉप आपटून तोडला. त्यामुळे आपले १० लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

नागरिकावर तोडफोड केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असला तरी रात्री उशिरापर्यंत स्पिकर चालू ठेवून लोकांना त्रास होईल
इतका आवाज ठेवणार्‍या क्लबवर मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही.
सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | The citizen raised his voice against the speaker’s
harassment; Vandalism of sound system, FIR in Kondhwa police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा