Pune Crime News | ‘वाहतुकीची समस्या सोडवा’ ओरडत टोळक्याने वाहनांमधील सोडली हवा, कात्रज-कोंढवा रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील ‘वाहतुकीची समस्या सोडवा’ असे ओरडत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांमधील हवा सोडल्याची विचित्र घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa Road) घडली असून टोळक्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलीस शिपाई विठ्ठल एकनाथ चिपाडे (वय-36) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 7 ते 8 अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 143, 341, 283, 427 504, 506, सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रोडवर 7-8 व्यक्ती बेकायदेशिररित्या एकत्र जमले. त्यांनी कोंढवा दिशेला जाणाऱ्या वाहन चालकांना अडवले. वाहन चालकांना दमदाटी व शिवीगाळ करुन त्यांच्या वाहनाच्या पुढील चाकातील हवा सोडून दिली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. टोळक्याने वाहनांची हवा सोडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. (Pune Crime News)

यावेळी टोळक्याने ‘ही वाहतुक समस्या सोडवा’ असे मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन
सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केला. वाहनांमधील हवा सोडल्यानंतर टोळक्याने तिथून पळ काढला.
आरोपींनी वाहनांमधील हवा सोडून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात (PSI Thorat) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उलटल्याने भीषण अपघात, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उलटल्याने भीषण अपघात, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुण्यातील सराईत गुन्हेगार अमरावती कारागृहात स्थानबद्ध

पुणे : पेट क्लिनिकमध्ये कुत्र्याचा गळफास लागून मृत्यू, डॉ. संजीव राजाध्यक्ष, डॉ. शुभम राजपूत यांच्यासह चौघांवर FIR