Pune Crime News | पुणे : पेट क्लिनिकमध्ये कुत्र्याचा गळफास लागून मृत्यू, डॉ. संजीव राजाध्यक्ष, डॉ. शुभम राजपूत यांच्यासह चौघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लसीकरणासाठी पेट क्लिनिक मध्ये आणलेल्या कुत्र्याचा गळफास लागून मृत्यू झाला. याप्रकरणी दोघा डॉक्टरांसह चार जणांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाषाण (Pashan) येथील विगल्स माय पेट क्लिनिक (Wiggles My Pet Clinic) मध्ये घडली. (Pune Crime News)

याबाबत बाणेर-पाषाण लिंक रोड येथील 35 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार डॉ. संजीव राजाध्यक्ष Dr.Sanjiv Rajadhyaksha (वय-60), डॉ. शुभम राजपूत Dr. Shubham Rajput (वय-35) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे हनी नावाचा लॅब्रेडोर जातीचा कुत्रा होता (Labrador Dog). त्याचे वर्षिक लसीकरण आणि नेल्स ट्रीमिंग करण्यासाठी माय पेट क्लिनिकमध्ये घेऊन गेल्या होत्या. (Pune Crime News)

क्लिनिकमध्ये फिर्यादी यांनी कुत्र्याला डॉक्टरांच्या ताब्यात दिले. डॉ. राजपूत आणि त्यांच्या इतर दोन मदतनिसांनी फिर्यादी यांच्या कुत्र्याला त्यांच्याकडील पट्ट्याने झाडाला बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. राजपुत यांनी लावलेला पट्टा कुत्र्याच्या गळ्याला घट्ट झाला. त्यामुळे कुत्रा खाली कोसळला. यानंतर डॉक्टर त्याला उपचारासाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेले. 15 मिनिटांनी डॉक्टरांनी फिर्यादी यांना तुमचा कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

त्यानंतर डॉ. संजीव राजाध्यक्ष व डॉ. शुभम राजपूत हे फिर्यादी यांच्याशी काहीही न बोलता तिथून पसार झाले. फिर्यादींचा कुत्रा 40 दिवसांचा असल्यापासून तो 12 वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याकडे होता. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत दोन डॉक्टर व त्यांच्या इतर दोन मदतनीस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना