Pune Crime News | भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांना बांबुने मारहाण; वारजेमधील घटना, दोघे जखमी

पुणे : Pune Crime News | रस्त्यावर भाजी विक्री करणार्यांवर कारवाई करायला गेलेल्या अतिक्रमण विभागातील (Encroachment Department (PMC) अधिकारी व कर्मचारी यांना विक्रेत्यांनी हाताने व बांबुने मारहाण (Beating) करुन जखमी केले. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून वारजे पोलिसांनी (Pune Police) चौघांना अटक केली आहे. (Pune Crime News)
याबाबत सहायक अतिक्रमण निरीक्षक अंकुश बादाड Assistant Encroachment Inspector Ankush Badad (वय ३१, रा. सासवड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १११/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ बाळासाहेब वांजळे Navnath Balasaheb Wanjale (वय ३२, रा. विजय दुर्गा कॉलनी, वारजे), रोहन मल्हारी माळशिखरे Rohan Malhari Malsikhre (वय १८, रा. शिवणे), सुभाष मारुती बोडके (वय ४०, रा. शिवणे), गणेश गोरबा हुंबरे Ganesha Gorba Humbare (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार वारजे (Warje News) येथील एनडीए रोडवरील एनडीए ग्राऊंडचे बाजुला रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी,
कर्मचारी रविवारी सायंकाळी गाडी घेऊन अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करीत होते.
हे पथक एनडीए ग्राऊंडजवळ अले असताना तेथे भाजी विक्री करणार्यांना त्यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले.
तेव्हा आज रविवार असताना कशी काय कारवाई करता, असे त्यांनी विचारणा केली.
तेव्हा कर्मचारी भाजीपाला व फळ व्रिकेत्यांचा माल उचलण्यास सुरुवात केली.
फिर्यादी हे मोबाईलमध्ये त्याचे शुटींग करत होते. तेव्हा चार ते पाच जणांनी फिर्यादी यांना गाडीतून खाली खेचले.
त्यांना हाताने व बांबुने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे सहकारी निलेश सांबरे हे सोडविण्यासाठी
आले असताना त्यांनाही मारहाण केली. भाजीपाला विक्रेत्यांचा जमाव प्रक्षोभक होऊ लागल्याने हे सर्व जण
जीव वाचविण्यासाठी तेथून गाडी घेऊन पळून वारजे पोलीस ठाण्यात आले.
त्यानंतर दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
Web Title :- Pune Crime News | Those who took encroachment action against vegetable sellers were beaten with bamboo; Incident in Warje, two injured
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Home Remedy For Back Pain Treatment | पाठदुखीवर रामबाण उपाय ! आरामासाठी ‘हे’ घरगुती उपाय वापरा
Home Remedy For Asthma | दम्यावर आराम देऊ शकतात ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या
Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या