Pune Crime News | इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील येरवडा येथील इझी पे प्रा. लि. कंपनीला (Easy Pay Private Limited) साडेतीन कोटी रुपयांचा गंडा (Pune Cyber Crime News) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दोन एजंट यांना अटक केली होती. यानंतर त्यांच्या दोन साथीदारांचा माग काढून पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. आरोपींनी इझी पे कंपनीची 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. (Pune Crime News)

अंकित कुमार अशोक पांडे Ankit Kumar Ashok Pandey (20, सध्या रा. सी/18, निबे दितो पार्क, ममरा, दुर्गापुर, बर्धमान, पश्चिम बंगाल. मुळ रा. महेश दिन गाव, काजीया, गोडापूर, नवादा, बिहार), छोटू उर्फ एजाज आलम जिआऊल अन्सारी Chhotu alias Ejaz Alam Jeaul Ansari (वय-28 रा. कुरमेडी बाजार, सहजानंद शाळेजवळ, बालीडी, झारखंड, मूळ रा. रेगनीय पोस्ट झरी, थाना आसम, गया, बिहार) यांना यापूर्वीच अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर केले आहे. (Pune Crime News)

गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून फरार आरोपींची माहिती व तपासात प्राप्त झालेली इतर माहितीच्या
आधारे आरोपींचे तांत्रिक विश्लेषण केले. फरार आरोपी उबेद उर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (वय-36 रा. आमस, गया, बिहार)
व आयुब बशिर आलम (रा. रिगनिया, गया बिहार) यांचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्ली येथे पाठवण्यात आले. आरोपी त्यांचा राहण्याचा पत्ता वारंवार बदलत असल्याने ते पोलिसांना सापडत नव्हते. पथकाने आरोपींचा माग काढला असता ते दिल्ली येथून बिहार तिथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पथकाने पश्चिम बंगाल येथून आरोपींना सपाळा रचून अटक केली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त आर. एन. राजे
(ACP R.N. Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Senior PI Minal Supe Patil),
पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले (PSI Tushar Bhosale), पोलिस अंमलदार संदेश कर्णे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव,
शाहरुख शेख, निलेश लांडगे, नितीन चांदणे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार