Pune Crime News | सायबर चोरट्यांकडून पाषाण, लोहगाव येथील दोघांची 26 लाखांची फसवणूक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) दाखवलेल्या आमिषाला नागरिक बळी पडत आहेत. पार्ट टाईम जॉब (Part Time Job), जास्तीचे कमीशन देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. पुण्यातील पाषाण आणि लोहगाव येथील दोघांना सायबर गुन्हेगारांनी अशाच प्रकारे गंडा (Cheating Fraud Case) घातला आहे. (Pune Crime News)

पाषाण येथील लक्ष्मी अन्नपुर्णा वेच्चा (वय-43) यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. त्यांना कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून त्यांना मोबाईल मध्ये रिमोट डिव्हाईस अॅप, Any Desk, Avval Desk अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी सायबर चोरट्यांवर विश्वास ठेऊन अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ताबा घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 2 लाख 608 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करुन घेऊन फिर्यादी बँक खात्यातून 3 लाख 26 हजार 080 रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात 095640XXXXX, 062958XXXXX, 74397XXXXX मोबाइल धारक व विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) करीत आहेत. (Pune Crime News)

ADV

कमीशनच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

कमीशन देण्याच्या बहाण्याने लोहगाव येथील एका व्यक्तीला 22 लाख 82 हजार 080 रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी मितेश मदनदास गुजराथी (वय-36) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station)
फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम आयडी धारक व बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुजराथी यांना वेगेवेगळ्या टेलिग्राम आय़डी धारकांनी संपर्क करुन टास्क पूर्ण केल्यानंतर जास्तीचे कमीशन देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून गुजराथी यांना पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्य़ादी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर 22 लाख 82 हजार 080 रुपये पाठवले. सायबर चोरट्यांनी कमीशन तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी (PI Sangeeta Mali) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sara Ali Khan Viral Video | सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकरी भडकले, व्हायरल व्हिडिओ पाहून म्हणाले,..

Gold Silver Latest Rate | सणासुदीला सोने-चांदी महागले! खरेदी जाणून घ्या नवीन दर