Gold Silver Latest Rate | सणासुदीला सोने-चांदी महागले! खरेदी जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : Gold Silver Latest Rate | सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. दिवाळीत धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. यावर्षी धनत्रयोदशी १० नोव्हेंबर २०२३ ला आहे. मात्र, आज २ नोव्हेंबर २०२३ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ (Gold Silver Latest Rate) झाली आहे.

सोन्याचा आजचा दर
फ्युचर्स मार्केटनुसार, आज सोन्याचा दर ६०,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. यानंतर किंमतीत आणखी वाढ दिसून आली. कालच्या तुलनेत सोने १२८ रुपये वाढीसह ६०,९१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. काल सोन्याचा भाव ६०,७८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. (Gold Silver Latest Rate)

चांदीचा आजचा दर
आज चांदीच्या दरात सुद्धा वाढ दिसून आली. चांदीचा व्यवहार सुरू झाल्यानंतर चांदी ७१,६९० रुपये प्रति किलोच्या पातळीवर खुली झाली. यानंतर किंमतीत आणखी वाढ झाली आहे. चांदी कालच्या तुलनेत ५३३ रुपयांनी महाग झाली आहे. ७१,८३१ रुपये प्रति किलो झाली आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव ७१,२९८ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

प्रमुख शहरातील सोने-चांदीचे दर

  • नवी दिल्ली – २४ कॅरेट सोने ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो.
  • मुंबई – २४ कॅरेट सोने ६१,६४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,१०० रुपये प्रति किलो.
  • कोलकाता – २४ कॅरेट सोने ६१,६४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो.
  • चेन्नई – २४ कॅरेट सोने ६२,१३० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७७,७०० रुपये प्रति किलो.
  • नोएडा – २४ कॅरेट सोने ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो.
  • पाटणा – २४ कॅरेट सोने ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंनी सरकारला खडसावलं, मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? ‘त्यांचा…’

Pune Crime News | येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन खून, 5 आरोपी ताब्यात

Nandurbar Police | खाकी वर्दीतील माणुसकी! अपघातातील मृत पोलीस अंमलदाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, नंदुरबार पोलीस अधीक्षक पीआर पाटील याच्या हस्ते धनादेश सुपुर्द