Pune Crime News | पुण्यात पहाटे 2 वाजता बारमध्ये पोलिसांच्या वर्दीला घातला हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पहाटेपर्यंत बार उघडा ठेवून त्यात मोठमोठ्याने सुरु असलेली भांडणे थांबविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाच्या (Pune Police) वर्दीलाच मद्यधुंद तरुणाने हात घालून त्यांना ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी रतन अभंगराव सूर्यवंशी Ratan Abhangrao Suryavanshi (शंकर महाराज मठामागे, ईशान्य इमारत) याला अटक केली आहे.

याबाबत पोलीस शिपाई अभिजित प्रल्हाद गोंजारी (Police Constable Abhijit Prahlad Gonjari) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२५/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी दुचाकीवरुन पेट्रोलिंग (Police Petrolig) करत होते. त्यावेळी रविवार पेठेतील मेहुणपुरा रोडवरील निधी बारमधून (Nidhi Bar Mehunpura Road) मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. त्यामुळे फिर्यादी हे तेथे गेले. तेव्हा तिघे जण तेथे भांडत होते. तेव्हा फिर्यादी यांनी ‘‘आरडाओरडा करु नका बाहेर जा’’ असे बोलले. तेव्हा आरोपी फिर्यादीला म्हणाले ‘‘आम्ही कोणीही कुठेही जाणार नाही, तुला काय करायचे ते कर. आम्ही तीन स्टार वाले अधिकारी खिशात घेऊन फिरतो, तु आमचे काय वाकडे करणार’’ असे बोलून फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून गेला. वर्दीची कॉलर पकडून त्यांना ढकलून दिले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कुंभारे (PSI Kumbhare) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Vishrambaug Police Station Arrest Ratan Abhangrao Suryavanshi Nidhi Bar Mehunpura Road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या