Pune Crime News | वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्यांची विश्रांतवाडी पोलिसांनी काढली धिंड (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्यात येत आहे. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही गुंडांकडून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. (Pune Crime News) अशीच एक घटना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत घडली होती. पोलिसांनी (Pune Police) आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक (Arrest) केली. एवढेच नव्हेतर, त्यांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर (Criminals) वचक बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवायांसह कायदेशीर उपाययोजना सुरु केली आहे. (Pune Crime News)

विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरात रिक्षा व दुचाकी वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण करुन फरार झालेल्या आरोपींच्या विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची परिसरातील दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांची शांतीनगर परिसरातून धिंड काढण्यात आली. यामुळे हे गुन्हेगार पुन्हा अशा प्रकारचा गंभीर गुन्ह करणार नाहीत यासाठी ही उपाययोजना पुणे पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त
रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Sr PI Dattatray Bhapkar),
गुन्हे निरीक्षक भालचंद्र ढवळे (PI Bhalchandra Dhavle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख
(API Ansar Shaikh), तपास पथकाचे उपनिरीक्षक लहू सातपुते
(PSI Lahu Satpute) यांच्यासह विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे