Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशन : आर्मीच्या सुरक्षा रक्षकासह दोघांना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले

पुणे : Pune Crime News | लष्करात सुरक्षा रक्षकासह (Army Security Guard) नाईक असलेल्या दोघांना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने (Robbery In Pune) चोरुन नेले. (Pune Crime News)

याप्रकरणी परशुराम बसप्पा नागराळ (वय ३९, रा. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युट, मुंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडी येथील सोपानबागेजवळील छोटा कॅनॉल रोडवर ८ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

फिर्यादी हे स्पोर्ट इन्स्टिट्युट मुंढवा (Sport Institute Mundhwa) येथे चालक म्हणून नोकरीला आहेत. ते सायकलवरुन घरी जात होते. तेव्हा एका सुरक्षा रक्षकाला तिघे जण पकडून मारत होते. फिर्यादीला पाहून त्यांच्यातील एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला. त्यानंतर तिघांनी फिर्यादी यांना पकडून त्यांची सायकल कॅनॉलमध्ये फेकून दिली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास भाग पाडले. तसेच सुरक्षा रक्षक मोहीत छोटेलाल साकेत याला हाताने मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील मोबाईल व दीडशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन तिघे जण पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक शितोळे (PSI Shitole) तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Wanwadi police station: Army security guard and two robbed by three thieves at knifepoint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

Maharashtra Cabinet Expansion | भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; मंत्रिमंडळातील चौघांना मिळणार डच्चू?, ‘या’ भागातील मंत्र्यांचा समावेश

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे