Pune Crime News | वारजे माळवाडी : 10 डिलिव्हरी बॉयकडून 20 लाखाची फसवणूक; डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जिओ मार्ट कंपनीकडून (Jio Mart Company) ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना न देता त्या परस्पर विकून कंपनीची २० लाख ७० हजार ७१६ रुपयांचा अपहार (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Waraje Malwadi Police) डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे महेश सोनवणे (Mahesh Sonawane), मयुर कडु (Mayur Kadu), प्रशोत कांबळे (Prashot Kamble), आदित्य वाघमारे (Aditya Waghmare), अभिषेक साठे (Abhishek Sathe), अनंत करचे (Anant Karche), ललित शिंदे (Lalit Shinde), राज गुप्ता (Raj Gupta), महादेव कांबळे (Mahadev Kamble), सिद्धांत मराठे (Siddhant Marathe) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत विनोद तात्या राखे (वय २७, रा. चिंबळी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १३५/२३) दिली आहे. हा प्रकार शिवणे येथील अगरवाल गोडावूनमध्ये जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डिलिव्हरी प्लस (Delivery Plus) ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतून जिओ मार्ट कंपनीकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तु ग्राहकांना पोहोच केल्या जातात. त्यासाठी अनेक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याकडील १० डिलिव्हरी बॉयने गोडावूनमधून वस्तू घेतल्या.पण, त्या ग्राहकांना पोहोच न करता दुसर्‍या ग्राहकांला विकल्या.
त्याचे पैसे ऑफिसमध्ये जमा न करता १९ लाख ७२ हजार ७१६ रुपयांच्या वस्तू आणि ९८ हजार रुपये रोख असा
एकूण २० लाख ७० हजार ७१६ रुपयांचा अपहार केला.
पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Warje Malwadi: 20 lakh fraud by 10 delivery boys;
Crime against 10 people working as delivery boys in Delivery Plus company

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा