Gram Panchayat Bypolls Election | राज्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 3666 जागांसाठी 18 मे रोजी मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gram Panchayat Bypolls Election | राज्यातील महापालिकांच्या निवडणुका (Municipal Election) विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. याच दरम्यान राज्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat Bypolls Election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे. यानुसार राज्यातील 3 हजार 666 रिक्त जागांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान (Voting) होणार आहे.

 

राज्यातील दोन हजार 620 ग्रामपंचायतीत रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीमधील तीन हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे.

 

राजीनामा, सदस्यत्व रद्दे झालेले, निधन अथवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य व थेट सरपंच (Direct Sarpanch) पदांच्या पोटनिवडणुकीसाठी ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी 25 एप्रिल ते 2 मे 2023 असणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी 3 मे 2023 रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 असून सायंकाळी 7.30 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
तसेच याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.
मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

Web Title :- Gram Panchayat Bypolls Election | maharashtra gram panchayat bypolls election 3666 seats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र