Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरे हे स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी महिलांची…’, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | रोशनी शिंदे (Roshni Shinde) या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त करताना आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे, असं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असं उत्तर दिलं. अशातच मनसेचे नेते प्रकाश महाजन (MNS Leader Prakash Mahajan) यांनी आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांच्यावर (Maharashtra Politics News) गंभीर आरोप केला आहे.

 

महिलांची ढाल पुढे करत…
प्रकाश महाजन म्हणाले, स्वत:चं हिंदुत्व (Hindutva) श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र काम केलं आहे. सरकार चालवलं आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संयमी माणसाचे मूल्यमापन करुन त्यांना फडतूस म्हणता, हे योग्य नाही. उद्धव ठाकरेंचा सल्लागार कोण आहे हाच मला प्रश्न पडतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी महिलांची ढाल पुढे करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

 

रोशनी शिंदेंचा विषय राजकारणाचा केला
महाजन पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या मी तीन सभा ऐकल्या. अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सहा वर्षांच्या नातीची चौकशी केली हा मुद्दा मांडला. ईडीने (ED) लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या गरोदर सुनेची चौकशी केल्याचे उदाहरण दिले. त्यानंतर आता रोशनी शिंदेंचा विषय त्यांनी राजकारणाचा केला आहे. दुसरीकडे तुमचाच सहकारी संजय राऊत (Sanjay Raut) एका महिलेला शिव्या देतो त्याबाबत एक शब्दही उद्धव ठाकरे उच्चारत नाही, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

हा कुठला समंजसपणा आहे?
तुमच्याच काळात केतकी चितळेला (Ketaki Chitale) तुरुंगवास सहन करावा लागला. कंगनाला (Kangana Ranaut) त्रास दिला गेला. राजकारणात तुम्ही स्त्रियांना का पुढे करत आहात? राजकारणाच्या (Maharashtra Politics News) सोयीसाठी स्त्रियांची ढाल करणं हा कुठला समंजसपणा आहे? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला. सत्ता गेल्याने त्यातून उद्धव ठाकरे हे सगळं करत आहेत, असा देखील आरोप त्यांनी केला.

 

आत्ताचं राजकारण खालच्या पातळीला गेलं
जुन्या काळी सत्ता ही सेवेचं साधन होतं. सत्ता आली तरीही संयम अनेक नेत्यांनी सोडला नाही.
तर दुसरीकडे सत्ता गेली म्हणूनही त्यांनी संयम सोडला नाही.
अटलजी (Atal Bihari Vajpayee) असतील किंवा प्रमोद महाजन (Pramod Mahajan) असतील यांचं राजकारण त्या पातळीवरच होते.
आत्ता तसं घडत नाही. राजकारण खूप खालच्या पातळीला गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना संयम सोडला.
समोरच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली तर सांगितलं जात होतं. मात्र आत्तासारखं राजकारण होत नव्हतं, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics News | uddhav thackeray is shielding women to make his own hinduism superior said mns leader prakash mahajan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र