Pune Crime News | ‘आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहे…’ दारु पिण्यासाठी खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारु पिण्यासाठी आम्हाला दोनशे रुपये दे. आम्ही आत्ताच जेलमधून (Yerwada Jail) आलो आहे, आम्ही लोणी काळभोरचे (Loni Kalbhor Police Station) भाई आहोत, पैसे दे नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही असे म्हणत खंडणी मागणाऱ्या (Extortion Case) दोन भाईंविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विवेक उर्फ विकी तेलंग Vivek Alias Vicky Telang (रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर) आणि पियुष भिसे Piyush Bhise (रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या स्वयंघोषित भाईंची नावे आहेत. याप्रकरणी संभाजी सोपान काळभोर (वय-55 रा. बाजारमळा) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी काळभोर हे त्यांच्या मुलासोबत पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे दारू पिण्यासाठी 200 रुपये मागितले. तसेच पैसे दिले नाही तर सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी काळभोर यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या दोघांनी त्यांच्या मुलाला मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच पियुष याने संभाजी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांनाही जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Political News | दहा वर्षात तयार झालेला पुण्याचा ‘बालेकिल्ला’ लोकसभेच्या तहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
स्वाधीन

Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | बच्चू कडूंचा बावनकुळेंना निर्वाणीचा इशारा,
म्हणाले – ‘अजून 10 खासदार पाठवले तरी…’

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडे लाच मागणाऱ्या पुणे महावितरणच्या कार्यकारी अभियंता
(क्लास वन) यांच्यावर एसीबीकडून FIR

Pune Shivsena News | पुणे शहरातील सर्व रस्ते खड्डेमय करणाऱ्या कंत्राटदारांवर तत्काळ कारवाई करा, पुणे शहर शिवसेनेची मागणी