Pune Crime News | ‘आमच्या सोबत का फिरत नाही?’ म्हणत दोन तरुणांना मारहाण, आंबेगाव मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आमच्या सोबत का फिरत नाही? अशी विचारणा करुन दोन तरुणांना बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. यामध्ये एका तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून ही घटना 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास आंबेगाव खु. येथील जैन मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत आर्यन रमेश लामा (वय-23 रा.प्रथमेश रेसेडन्सी, जैन मैदिर, आंबेगाव खु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन गणेश दोडमणी, संकेत रेणुसे (रा. शिंदेवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 326, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन लामा हे त्यांचा मित्र संतोष कचरावत व जय पाटोळे यांच्यासोबत जैन मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आर्यन च्या ओळखीचे आरोपी गणेश व संकेत हे लाकडी बांबु घेऊन त्या ठिकाणी आले. आरोपींनी फिर्य़ादी आर्यन याला म्हणाले ‘तुम्हाला बराच वेळा आमच्या बरोबर बसत जा, आमच्या बरोबर फिरत जा असे सांगून देखील तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही’ अशी विचारणा केली. (Pune Crime News)

यावर, आम्हाला मारामारी व भांडण आवडत नाही त्यामुळे तुमच्या सोबत येत नाही, असे आर्यन याने सांगितले.
याचा राग आल्याने आरोपी गणेश याने लाकडी बॅटने आर्यन याला मारहाण केली.
तर संकेत याने लाकडी बांबुने उजव्या खांद्यावर मारहाण केली. यामध्ये आर्यन याचा हात फ्रॅक्चर झाला.
तर आरोपींनी संतोष कचरावत याला हाताने बेदम मारहाण करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण, दहशत पसरवणाऱ्या तरुणावर FIR