Pune Crime News | सार्वजनिक रोडवर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, हडपसरमधील प्रकार; दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बहिणीला डबा देऊन परतणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच तिला बघुन घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार हडपसर येथील काळुबाई मंदिराजवळील रिक्षा स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. हा प्रकार 16 नोव्हेबर रोजी रात्री सव्वा दहा व शनिवारी (दि.18) सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत 14 वर्षाच्या पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर हारगुडे (वय-37), भूषण कठारे (वय-28 रा. सहकार कॉलनी, साडेसतरानळी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 354, 354अ, 504, 506, 34 पोक्सो कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मामे बहिणीला डबा देऊन काळुबाई मंदिराजवळील रिक्षा स्टॉपवर आली. त्यावेळी आरोपी सागर हारगुडे याने मुलीला जवळ बोलावून घेतले. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करुन जाऊ लागली. त्यावेळी आरोपीने तिचा रस्ता आडवला. तर भुषण कठारे याने मुलीचे दोन्ही हात पकडले. त्यानंतर सागर याने मुलीसोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पीडित मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिचे तोंड दाबले. तसेच शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (API Thorbole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात 25 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, कोंढवा पोलिसांकडून एकाला अटक

ऐन दिवाळीत पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे शहरात दोन ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रा. नामदेव जाधवांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल